विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण सुरक्षेसाठी वाहतुकीचे नियम पाळा

भुसावळातील एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये परिवहन समितीची सहविचार सभा


भुसावळ (13 जुलै 2026) : शहरातील एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये परिवहन समितीची सहविचार सभा सोमवार, 13 रोजी सकाळी वाजता झाली. अध्यक्षस्थानी भुसावळ शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक राहुल भाऊसाहेब भंडारे होते. संस्थेचे सेंकेटरी पी.व्ही.पाटील, ऑनररी जॉईट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, बी.आर.सी.चे संजय गायकवाड, शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना कोल्हे, पर्यवेक्षिका राखी बढे, पालक प्रतिनिधी स्वप्नील कोंगे, प्रणिता सुशिर रिक्षाचालक प्रतिनिधी हितेंद्र तळेल, अनिल पाटील उपस्थित होते.

विद्यार्थी सुरक्षेसाठी वाहतुकीचे नियम पाळा
सर्व रिक्षा चालकांनी विद्यार्थी वाहतुकीचा परवाना काढावा, प्रत्येक रिक्षेच्या पुढील व मागील बाजुस विद्यार्थी चित्र लावावे जेणेकरून संबधित रिक्षेमध्ये विद्यार्थी आहेत असे लक्षात येईल, विद्यार्थ्यांची फ्रंट सीट वाहतूक करू नये तसेच नियमानुसार मर्यादित विद्यार्थी संख्येची वाहतूक असावी व वाहतक नियमांचे पालन करावे तसेच अल्पवयीनांच्या हाती पालकांनी दुचाकी देवू नये, असे आवाहन सहा.निरीक्षक राहुल भंडारे यांनी केले. काही अपघात घडल्यास 112 नंबर वर अथवा विद्यार्थी सुरक्षेसाठी 1098 संपर्क साधावा, असेही ते म्हणाले.

मुख्याध्यापिका यांनी शाळेतील विविध शालेय उपक्रमांबाबत व विविध समित्याबाबत पालकांना माहिती दिली. आभार धनश्री पाटील यांनी मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !