भुसावळात श्री लक्ष्मी व्यंकटेश देवस्थानात 14 ते 16 जुलै दरम्यान ब्रह्मोत्सव कार्यक्रम


भुसावळ (13 जुलै 2026) : शहरातील ‘श्री लक्ष्मी व्यंकटेश देवस्थानात’ दर वर्षाप्रमाणे यावर्षीही मंगळवार, 14 जुलै ते गुरुवार, 16 जुलै या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

विविध कार्यक्रम होणार
व्यंकटेश चॅरिटेबल ट्रस्ट व श्री लक्ष्मी व्यंकटेश देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने या ब्रह्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे हे 29 वे वर्ष आहे. भाविकांना प्रेरणा देणारे स्वामी श्री केशवाचार्यजी महाराज व आशीर्वाद देणारे प. पू. युवराज स्वामीजी महाराज हे असणार आहेत.

धार्मिक कार्यक्रमांची रूपरेषा
मंगळवार, 14 जुलै रोजी सकाळी सात वाजता मंदिर प्रवेश, श्री व्यंकटेश देव व पद्मावती माता यांचे पूजन व अभिषेक, प्रथम पाठ, आरती आणि संध्याकाळी देवी-देवतांची पालखी काढण्यात येईल.

बुधवार, 15 जुलै रोजी श्री रामानुजन स्वामीजी व गोदंबाजी यांचा अभिषेक, हवन, पूजन, आरती आणि व्यंकटेश स्तोत्र पठण केले जाईल. संध्याकाळी 5.15 वाजता मंदिर परिसरात देवी-देवतांची पालखी निघेल.

गुरुवार, 16 जुलै रोजी सकाळी श्रीदेवी, भूदेवी सह श्री व्यंकटेश देवांचा महाअभिषेक, प्रबंध पाठ आणि आरती होईल. दुपारी 12 वाजता ब्रह्मोत्सव व पूर्णाहुती संपन्न होईल. भव्य शोभायात्रा आणि महाप्रसादाचे वाटप होईल.

गुरुवार, 16 जुलै रोजी संध्याकाळी 4.30 वाजता श्री लक्ष्मी व्यंकटेश देवी-देवतांची वाजत-गाजत भव्य शोभायात्रा (नगर प्रदक्षिणा) काढण्यात येणार आहे. त्यानंतर सात वाजता आरती व महाप्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता होईल. या सर्व धार्मिक कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी, ब्रिजमोहन अग्रवाल, मिलिंद अग्रवाल, रामवल्लभ झंवर, जे.बी.कोटेचा, राजेश चांडक, मधूलता शर्मा, दीपक काबरा आणि गोपाल राठोड यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !