इनर व्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीचा पदग्रहण सोहळा

योगिता वायकोळेंनी अध्यक्षा म्हणून तर कविता पाचपांडेनी स्वीकारला सचिवपदाचा पदभार


भुसावळ (मंगळवार, 14 जुलै 2026) : इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीचा सन 2026-27 या वर्षासाठीचा पदग्रहण सोहळा प्रभाकर हॉलमध्ये नुकताच झाला. प्रसंगी योगिता वायकोळे यांनी अध्यक्षपदाचा तर कविता पाचपांडे यांनी सचिव म्हणून पदभार स्वीकारला.

यांची होती उपस्थिती
अतिथी म्हणून प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, रश्मी शर्मा, संगीता घोडगावकर उपस्थित होत्या. त्यांच्याहस्ते नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा पार पडला.

नूतन पदाधिकार्‍यांचा सत्कार
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व इनरव्हील प्रार्थनेने झाली. यावेळी मावळत्या अध्यक्षा सीमा सोनार यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांनी आपल्या कार्यकाळातील विविध सेवाभावी उपक्रमांचा आढावा घेत नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर नव्या पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला.

नवनियुक्त अध्यक्षा योगिता वायकोळे यांनी आगामी वर्षात महिलांचे सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि विविध समाजोपयोगी उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.

सूत्रसंचालन डॉ.मृणाल पाटील व डॉ.आरती चौधरी यांनी केले. कार्यक्रमास इनरव्हील क्लबच्या सदस्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !