भुसावळातील एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये कालिदास दिन उत्साहात
भुसावळ (बुधवार, 15 जुलै 2026) : शहरातील एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये बुधवार, 15 रोजी सकाळी साडेसात वाजता शाळेच्या आवारात कालिदास दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
प्रमुख म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना कोल्हे, पर्यवेक्षिका राखी बढे उपस्थित होत्या. कालिदास दिनानिमित्त शाळेतील संस्कृत शिक्षिका तनुजा चौघरी यांनी कालिदासाची माहिती दिली. संस्कृत परीक्षेत सरला अभ्यासक्रम चार विद्यार्थी आणि सुगमा अभ्यासक्रम तीन, सरसा अभ्यासक्रम तीन विद्यार्थी प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांना कालिदास दिनानिमित्त मुख्याध्यापिका अर्चना कोल्हे, पर्यवेक्षिका राखी बढे यांच्याहस्ते बक्षिसे वितरण करण्यात आले.

विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.मकरंद एन.नारखेडे, तसेच संस्थेतील सर्व सभासदांतर्फे विद्यार्थ्यांचे कौतुक करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
