जोगलखेडे व भानखेडे जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप
भुसावळ (गुरुवार, 16 जुलै 2026) : भुसावळ तालुक्यातील जोगलखेडे व भानखेडे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना भुसावळ येथील भंगाळे परिवाराकडून शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप सरपंच सारिका पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
2018 पासून सतत भुसावळ येथील रहिवासी रवींद्र भंगाळे (सध्या वास्तव्य- अमेरिका) हे जोगलखेडे व भानखेडे येथील विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक साहित्य, दप्तर तसेच इतर शालोपयोगी साहित्य व खाऊ शैक्षणिक वर्ष सुरू होतांनाच देत असतात. यावर्षी सुद्धा दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांना आवश्यक ते शैक्षणिक साहित्य तसेच विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.


यांची होती उपस्थिती
यावेळी माजी सरपंच पंकज पाटील, तुकाराम राजाराम भंगाळे, शशिकला भंगाळे, जोगलखेडे मुख्याध्यापक जितेंद्र झांबरे, भानखेडे मुख्याध्यापक गणेश फेगडे, शिक्षिका सोनाली तायडे, रामचंद्र पाटील, सुधाकर पाटील आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक जितेंद्र झांबरे यांनी तर आभार सोनाली तायडे यांनी मानले.