भुसावळ रेल्वे स्थानकावरील जुन्या खंडवा बाजूच्या एन-टाइप पादचारी उड्डाणपुलाला हटवण्याच्या कामाला सुरुवात


जळगाव (शुक्रवार, 17 जुलै 2026) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागामार्फत भुसावळ रेल्वे स्थानकावरील खंडवा बाजूस असलेल्या जुन्या एन-टाइप पादचारी उड्डाणपुल हटवण्याच्या कामाला शुक्रवार, 17 पासून सुरूवात करण्यात आली. या कामामुळे रेल्वेच्या वाहतुकीवर कुठलाही परिणाम झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

असे होणार काम
शनिवारी स्पॅन क्रमांक दोनद्वारे उत्तर बाजू प्रवेशद्वार व व्हीआयपी सायडिंग परिसर तसेच रविारी स्पॅन क्रमांक तीनद्वारे प्लॅटफॉर्म क्र. 7 व प्लॅटफॉर्म क्र. 6 आणि 7 मधील माग तसेच सोमवार, 20 रोजी प्लॅटफॉर्म क्र. 6 व प्लॅटफॉर्म क्र. 6 आणि 7 मधील मार्ग काढण्यात येणार आहे. हे काम रेल्वेच्या सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन करून रेल्वे क्रेनच्या सहाय्याने करण्यात येत आहे.

रेल्वे प्रवाशांना आवाहन
प्रवाशांनी काम सुरू असलेल्या परिसरात अनावश्यक गर्दी करू नये तसेच रेल्वे प्रशासनाने दिलेल्या सूचना, सूचना फलक आणि रेल्वे कर्मचार्‍यांच्या मार्गदर्शनाचे पालन करावे. आपल्या सुरक्षिततेसाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा व सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातर्फे करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !