भारत विकास परिषदेच्या भुसावळ शाखेचा दायित्व ग्रहण समारंभ उत्साहात
भुसावळ (शुक्रवार, 17 जुलै 2026) : भारत विकास परिषद या सामाजिक संस्थेचा नूतन कार्यकारिणीचा दायित्व ग्रहण समारंभ गुरुवार, 16 जुलै 2026 रोजी भुसावळ शहरातील व स्व.सुशीलाबाई पालक विद्यालयात झाला. महाराष्ट्र उत्तर प्रांताचे अध्यक्ष विशाल चोरडिया, भारत विकास परिषद प्रांत पालक अरुणजी जोशी उपस्थित होते.
नूतन कार्यकारिणीचा शपथविधी
सुरुवातीला दीपाली हिंगवे यांनी संपूर्ण वंदे मातरम सादर केले. मान्यवरांच्या हस्ते तुलसी पूजन आणि प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. नूतन कार्यकारिणीला चोरडिया यांनी शपथ दिली. यावेळी प्रमुख वक्ते प्रा.जयेंद्र लेकुरवाळे यांनी आपल्या प्रबोधनात्मक मनोगतामध्ये भारत विकास परिषद संस्थेच्या कार्याचा गौरव करताना भावी पिढी सामाजिक शालेय आणि सांस्कृतिकदृष्ट्या कशी समर्थ करता येईल यावर अनेक उत्तम उदाहरणे देऊन संबोधित केले.


यावेळी प्रांत पालक अरुणजी जोशी यांनी आपल्या संबोधनामध्ये भारत विकास परिषदेविषयी विस्तृत माहिती विशद करून सांगितले.यावेळी प्रांताचे उपाध्यक्ष योगेश मांडे यांची विशेष उपस्थिती लाभली.यावेळी मावळते अध्यक्ष सतीश खडायते यांनी मागील कार्याचा लेखाजोखा प्रेक्षक सदस्यांसमोर मांडला आणि सर्व सदस्यांचे सहकार्याबद्दल धन्यवाद मानले तसेच मावळते सचिव हरीश कोल्हे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि सर्व सदस्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले संस्थेचे मावळते कोषाध्यक्ष गौरव हिंगवे यांनी आर्थिक लेखाजोखा सादर केला यानंतर प्रांत अध्यक्ष विशाल चोरडिया यांनी नूतन कार्यकारिणीला शपथ प्रदान केली.
अशी आहे नूतन कार्यकारिणी
अध्यक्ष रमाकांत भालेराव उपाध्यक्ष, रुपेश जैन, हरीश कोल्हे, सचिव- शंतनु गचके, कोषाध्यक्ष- कपिल मेहता, विविध सेवागतीविधींमध्ये सेवा गतिविधी संजय लाहोटी, संस्कार गतीविधी सीमा बेंडाळे, महिला सहभागीता गतीविधी- जयश्री चौधरी, पर्यावरण गतिविधि- प्रदीप फिरके, संपर्क गतीविधी- विजय जोशी, संपर्कप्रमुख आनंद फडके
यावेळी विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या आणि इतर सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन राधा चव्हाण यांनी तर आभार हरीश कोल्हे यांनी मानले.