भुसावळातील लॉन, हॉलसह मॉलचे बांधकाम मंजूर नकाशापेक्षा अधिक बांधून अतिक्रमण : दिनेश उपाध्याय यांची तक्रार


भुसावळ (शनिवार, 18 जुलै 2026) : भुसावळ शहरातील वांजोळारोडवरील बालाजी लॉनी, व्यंकटेश लॉन व मॉर्डनरोडवरील गोपी शॉपींग मॉल या नगरपरिषदेच्या क्षेत्रातील व्यावसायिक प्रतिष्ठानांच्या बेकायदेशीरपणे मंजूर नकाशाप्रमाणे अधिक बांधकाम, पार्किंगच्या नियमांना छेद तसेच अग्निशमन नियमांचे उल्लंघन केल्याची तक्रारी माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश उपाध्याय यांनी केली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने नगरपालिकेने संबंधीत तिन्ही प्रतिष्ठानांना नोटीस बजावून अतिक्रमीत जागेच्या संदर्भात खुलासा मागवला आहे.

काय आहे प्रकरण ?
उपाध्याय यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, वांजोळा रोडवरील बालाजी लॉन व व्यकंटेश हॉल तसेच मॉर्डनरोडवरील गोपी शॉपिंग मॉल या प्रतिष्ठानांनी महाराष्ट्र नगरपरिषदा अधिनियम, 1965 आणि महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, 1966 मधील तरतुदींचे सरळ-सरळ उल्लंघन केले आहे. तिन्ही इमारतींनी मंजूर नकाशापेक्षा जास्त आणि बेकायदेशीर बांधकाम केले आहे. हे पूर्णपणे अवैध आहे.लॉन, हॉल आणि मॉल या सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची आणि वाहनांची गर्दी होते परंतु या व्यावसायिकांनी विकास नियंत्रण नियमावली धुडकावून पार्किंगसाठी राखीव असलेली जागा इतर कारणांसाठी म्हणजे बांधकाम केले आहे. यामुळे ग्राहक आपली वाहने मुख्य रस्त्यावर उभी करतात ज्यामुळे वाहतूक कोंडी होते व अपघातांचा धोका वाढला आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने पालिकेने तिन्ही प्रतिष्ठानांना नोटीस बजावून खुलासा मागवला आहे.


अग्निरोधक यंत्रणा नाही
पालिका हद्दीतील तिन्ही प्रतिष्ठानांनी अग्निशामक नियमांचे उल्लंघन केले आहे. या इमारतींमध्ये कोणतीही ‘फायर फायटिंग सिस्टीम’ किंवा अग्निशामक सिलिंडर बसवलेले नाहीत. पालिकेने प्रत्यक्ष पाहणी करुन कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणी पालिकेने तिन्ही प्रतिष्ठानांना नोटीस बजावून अतिक्रमीत जागेचा खुलासा मागवला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !