भुसावळातील म्युनिसिपल हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी


भुसावळ (शनिवार, 18 जुलै 2026) : शहरातील म्युनिसिपल हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीने शालेय आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल बडगुजर, फार्मासिस्ट वर्षा मोरे व रोहिणी शिरसाठ त्यांच्या पथकाने विद्यार्थ्यांची सविस्तर आरोग्य तपासणी केली.

यांची होती उपस्थिती
प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक व्ही.पी.सुलताने यांनी डॉ.राहुल बडगुजर यांचा पुष्पगुच्छ देऊन शाळेच्या वतीने सत्कार केला. फार्मासिस्ट वर्षा मोरे यांचा ज्येष्ठ शिक्षिका सरला सावकारे व शालिनी बनसोडे यांनी रोहिणी शिरसाठ यांनचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. यानंतर डॉ.राहुल बडगुजर यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्त्व, वैयक्तिक स्वच्छता, संतुलित आहार, नियमित व्यायाम तसेच आजारांपासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रश्न विचारले.


या शिबिरात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व आरोग्य विभागाच्या पथकाचे विशेष सहकार्य लाभले. आभार डॉ.प्रदीप साखरे यांनी मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !