यशाची परंपरा कायम : भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के

श्रेयांश सिंग शाळेत प्रथम : 32 विद्यार्थ्यांना दहा सीजीपीए गुण


 भुसावळ (सोमवार, 20 जुलै 2026) : शहरातील ताप्ती पब्लिक सीसबीएसई इंग्लिश मिडीयम स्कूलने दहावी परीक्षेत यशाची परंपरा कायम राखली आहे. यंदाही शाळेचा निकाल शंभर टक्के लागला. 235 विद्यार्थ्यांपैकी 32 विद्यार्थ्यांनी दहा सीजीपीए गुण मिळवले. श्रेयांश लक्ष्मीनारायण सिंग याने 97.2 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा बहुमान पटकावला.

विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव
शाळेतून हर्ष संजय छाबडिया आणि अनिश महेश चौधरी दोघे 96.6 गुण मिळवून द्वितीय आले तर साहिल हेमंत महाजन 96 टक्के गुण मिळवून तृतीय व स्वरदा शेखर केर्‍हाळकर 94.8 टक्के चौथा तसेच पाचवा क्रमांक अन्वी उदय गोसावी आणि रणवीर जयसिंग महाजन या दोघांना 94.6% गुण मिळवून पटकावला.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक, चेअरमन महेश फालक, सेक्रेटरी विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजय नाहाटा व प्रिंसिपल निना कटलर तसेच शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !