भुसावळात शिवस्वराज्य समाधान शिबिरात वाहतूक नियमांबाबत जनजागृती


भुसावळ (बुधवार, 22 जुलै 2026) : शहरातील संतोषी माता हॉलमध्ये बुधवार, 22 रोजी आयोजित करण्यात आलेल्या ’छत्रपती शिवाजी महाराज शिवस्वराज्य समाधान शिबिर’ अभियानादरम्यान भुसावळ पोलीस प्रशासनातर्फे वाहतूक सुरक्षा व वाहतूक नियमांविषयी व्यापक जनजागृती करण्यात आली. नागरिकांमध्ये वाहतूक शिस्त रुजविणे आणि रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.

यांची होती उपस्थिती
हा उपक्रम उपविभागीय पोलिस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ तसेच भुसावळ शहर वाहतूक शाखेचे सहा.निरीक्षक राहुल भंडारे व वाहतूक शाखेचे कर्मचारी उपस्थित होते.

वाहतूक नियमांची प्रभावी जनजागृती
शिबिरस्थळी नागरिकांना वाहतूक नियमांची सहज व प्रभावी माहिती मिळावी यासाठी विविध जनजागृतीपर बॅनर आणि माहिती फलक लावण्यात आले तसेच वाहतूक शाखेकडून दोन पोलीस अंमलदारांची विशेष नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी उपस्थित नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व, दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर, चारचाकी चालकांनी सीटबेल्ट लावण्याची आवश्यकता तसेच सुरक्षित वाहनचालनाच्या नियमांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

या जनजागृती उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रस्ते सुरक्षेबाबत जनमानसात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत जनतेमध्ये सकारात्मक संदेश पोहोचविण्यास हा उपक्रम उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !