भुसावळात दक्षिण आफ्रिकेतील 91 किमी कॉम्रेड मॅरेथॉन विजेत्या खानदेशातील धावपटूंचा गौरव


भुसावळ (बुधवार, 22 जुलै 2026) : दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात येणारी जगातील सर्वात जुनी आणि अत्यंत खडतर मानली जाणारी 91 किलोमीटरची आंतरराष्ट्रीय कॉम्रेड मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण करणार्‍या खानदेशातील धावपटूंचा तापी रनिंग ग्रुपच्या वतीने कोरोनेशन क्लबच्या मैदानावर गौरव सोहळा उत्साहात पार पडला.

यावर्षीची कॉम्रेड मॅरेथॉन निर्धारित वेळेत पूर्ण करून उल्लेखनीय कामगिरी करणारे डॉ.विवेक पाटील, डॉ.प्रशांत देशमुख, प्रतीक मणियार, डॉ.रती महाजन, विद्या बेंडाळे आणि गुरुप्रसाद तोतला यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे नेतृत्व कॉम्रेड मॅरेथॉन पाच वेळा यशस्वीरीत्या पूर्ण करणारे डॉ.तुषार पाटील आणि विजय फिरके यांनी केले. सत्कार सोहळ्यापूर्वी यावल नाका येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर कॉम्रेड ट्री म्हणून एका वृक्षाचे रोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यानंतर ढोल-ताशांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात आंतरराष्ट्रीय धावपटूंचे जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आले. या सोहळ्यास भुसावळ येथील रनर्स ग्रुपचे सदस्य तसेच हाफ आणि फुल मॅरेथॉन पूर्ण करणार्‍या महिला धावपटूंचीही विशेष उपस्थिती होती.

सूत्रसंचालन रोटरी क्लब रेल सिटीचे अध्यक्ष सुयश न्याती तर आभार प्रदर्शन अ‍ॅड.मोहन देशपांडे यांनी मानले.

यशस्वीतेसाठी सुरेश साहनी, कैलाश छाबरा, मुकेश चौधरी, जितेंद्र चौधरी, संतोष गवाले, वासुसेठ, कमलाकर सोनवणे, दीपक पाटील, डॉ. चारुलता पाटील, सीमा पाटील, प्रिया पाटील, जयश्री चौधरी आणि ममता ठाकूर यांनी विशेष परिश्रम घेतले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !