भुसावळातील म्युनिसिपल हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक जयंती उत्साहात


भुसावळ (गुरुवार, 23 जुलै 2026) : नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूलमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक व्ही.पी.सुलताने होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक व्ही. पी. सुलताने यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच उपस्थित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी शाळेच्या सेवाज्येष्ठ शिक्षिका सरला सावकारे, शालिनी बनसोडे, डॉ.प्रदीप साखरे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सरला सावकारे व नाना पाटील यांनी लोकमान्य टिळक तसेच क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या प्रेरणादायी कार्याची व देशसेवेची महती विद्यार्थ्यांना सांगितली.

मुख्याध्यापक व्ही.पी.सुलताने यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल व सोशल मीडियाच्या युगात वेळेचा सदुपयोग करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय लावावी, विज्ञाननिष्ठ विचार जोपासावेत, पर्यावरणाचे संरक्षण करावे आणि आपल्या देशाचे जबाबदार व प्रामाणिक नागरिक बनावे. हेच लोकमान्य टिळकांना खर्‍या अर्थाने अभिवादन ठरेल, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, आज या पवित्र दिनी आपण सर्वांनी देशप्रेम, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि उत्कृष्ट शिक्षणाचा संकल्प करूया. यावेळी लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणादायी कार्याला विनम्र अभिवादन करण्यात आले. सूत्रसंचालन एन.एच.राठोड यांनी तर आभार डॉ.प्रदीप साखरे यांनी मानले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !