हावडा स्थानकावरील कामाचा परिणाम ; भुसावळमार्गावरील आठ गाड्यांच्या प्रारंभ व अंतिम स्थानकात तात्पुरता बदल


भुसावळ (गुरुवार, 23 जुलै 2026) : दक्षिण पूर्व रेल्वेच्या हावडा विभागात हावडा स्थानकावरील लिंक केबिनच्या कामासाठी नॉन-इंटरलॉकिंगचे काम हाती घेण्यात येणार असल्याने भुसावळ विभागातून धावणार्‍या आठ महत्त्वाच्या मेल व एक्सप्रेस गाड्यांच्या प्रारंभ व अंतिम स्थानकात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांनी प्रवासापूर्वी गाडीची अद्ययावत माहिती तपासूनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

गाडी क्रमांक 12834 हावडा-अहमदाबाद एक्सप्रेस 24 व 25 जुलै रोजी हावडाऐवजी शालीमार स्थानकावरून सुटेल.

गाडी क्रमांक 12859 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हावडा गीतांजली एक्सप्रेस 24 व 25 जुलै रोजी सांतरागाछी स्थानकापर्यंतच धावेल. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक 12860 हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गीतांजली एक्सप्रेस 25 व 26 जुलै रोजी हावडाऐवजी सांतरागाछी स्थानकावरून नियोजित वेळेनुसार सुटेल.

गाडी क्रमांक 12809 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हावडा मेल एक्सप्रेस 24 जुलै रोजी सांतरागाछी स्थानकापर्यंतच धावेल. तर गाडी क्रमांक 12810 हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल एक्सप्रेस 25 व 26 जुलै रोजी हावडाऐवजी सांतरागाछी स्थानकावरून सुटेल.

गाडी क्रमांक 22893 साईनगर शिर्डी-हावडा एक्सप्रेस 25 जुलै रोजी सांतरागाछी स्थानकापर्यंतच धावणार आहे. तसेच गाडी क्रमांक 12221 पुणे-हावडा दुरांतो एक्सप्रेस 25 जुलै रोजी शालीमार स्थानकापर्यंतच धावेल. गाडी क्रमांक 12129 पुणे-हावडा आझाद हिंद एक्सप्रेसदेखील 25 जुलै रोजी सांतरागाछी स्थानकापर्यंतच धावणार आहे.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासास निघण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर, एनटीईएस किंवा रेलवन पवर गाडीची अद्ययावत माहिती तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून कोणतीही गैरसोय होणार नाही.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !