भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे महिलांसाठी मोफत शिवणकला व हॅण्ड एम्ब्रॉयडरी प्रशिक्षण शिबिर
स्वावलंबनाच्या दृष्टीने पाऊल : रोजगाराची सुवर्णसंधी
भुसावळ (24 जुलै 2026) : महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळाच्या मोफत शिलाई व हॅण्ड एम्ब्रॉयडरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणाचा कालावधी साधारण 45 ते 90 दिवसांचा असून प्रशिक्षण हे पूर्णपणे मोफत दिले जाणार आहे. प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्रही दिले जाणार असून या माध्यमातून स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्रशिक्षणातून महिला होणार स्वावलंबी
भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळाच्या माध्यमातून व क्लोथिंग म्यॅन्युफॅक्चर असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेमार्फत व मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल्स जॉक यांच्या मान्यतेने मोफत शिवणकला व हँड एम्ब्रॉयडरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन कसण्यात आले आहे.
45 ते 90 दिवस प्रशिक्षण कालावधी
या प्रशिक्षणात सहभागी होणार्या महिलांना प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर केंद्र सरकार मान्यताप्राप्त प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर रोजगार व नोकरीच्या संधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रशिक्षणासाठी शिलाई मशीन ऑपरेटर आणि हँड एम्ब्रॉयडरी (आरी वर्क) हे दोन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. प्रशिक्षणाचा कालावधी 45, 60 किंवा 90 दिवसांचा असून, प्रशिक्षण सकाळी 10 ते 12 आणि 12 ते 2.30 या वेळेत होणार आहे. यामध्ये आधुनिक मशिनवर प्रत्यक्ष प्रशिक्षण, मुंबईतील नामांकित फॅशन डिझायनर्सचे मार्गदर्शन, अभ्यासक्रमाची पुस्तके, नोट्स, ट्रेनिंग किट आदी सुविधा देण्यात येणार आहेत. 16 ते 44 वर्षे वयोगटातील महिला या प्रशिक्षणासाठी पात्र असतील.
प्रवेशासाठी असा साधा संपर्क
महिलांना प्रवेशासाठी आधार कार्ड (प्रत्येक एका झेरॉक्स प्रतीसह) आणि दोन पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहेत. प्रशिक्षणाचे ठिकाण मोरवी एंटरप्रायझेस, डी-19, किन्नी एम.आय.डी.सी., ता. भुसावळ येथे आहे. इच्छुक महिलांनी अधिक माहितीसाठी प्रीती पाटील (88884 76717), प्रज्ञा बारके (96652 09851) किंवा रुपाली काकडे (87667 98414) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. प्रवेश पूर्णपणे मोफत असून इच्छुक महिलांनी लवकरात लवकर नोंदणी करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे यांनी केले आहे.



