पोलीस कर्मचार्‍यांनो थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठू नका : जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सूचना


Police personnel: Do not go directly to the Superintendent of Police’s office – Instructions from the Jalgaon District Superintendent of Police जळगाव (रविवार, 26 जुलै 2026) : जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. वैयक्तिक कामांसाठी किंवा तक्रारींसाठी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक (एसपी) कार्यालयात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

सूचनेनुसार, सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांनी प्रथम आपल्या संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किंवा वरिष्ठ अधिकार्‍यांमार्फतच आपले प्रश्न, अर्ज किंवा मागण्या मांडाव्यात. आवश्यक असल्यास संबंधित वरिष्ठ अधिकारीच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधतील.

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात अनेक कर्मचारी थेट भेटीसाठी येत असल्याने प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे कार्यालयीन शिस्त राखण्यासाठी आणि कामकाज अधिक कार्यक्षम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

अनावश्यक गर्दी टाळण्याचा उद्देश
पोलीस अधीक्षक कार्यालय हे जिल्हास्तरीय प्रशासकीय कामकाजासाठी आहे. प्रत्येक वैयक्तिक कामासाठी थेट कार्यालयात येण्याऐवजी योग्य प्रशासकीय साखळीचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यापुढे कोणत्याही पोलीस कर्मचार्‍याने वैयक्तिक कारणासाठी किंवा कामानिमित्त थेट एस.पी.कार्यालयात येऊ नये. संबंधित शाखा, प्रभारी अधिकारी किंवा वरिष्ठ अधिकार्‍यांमार्फतच आवश्यक बाबी मांडाव्यात, असे आदेश जारी करण्यात आले आहेत. दरम्यान लोकमतने यासंदर्भात वृत्त दिले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !