भुसावळात मतदार यादीतील विसंगती दुरुस्तीसाठी प्रशासन सतर्क : नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह सहकार्य करण्याचे आवाहन


भुसावळ (रविवार, 26 जुलै 2026) : मतदार याद्या अधिक पारदर्शक, अचूक आणि त्रुटीमुक्त करण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत बीएलओ (इेेींह ङर्शींशश्र जषषळलशी) अ‍ॅपद्वारे मतदारांची माहिती अद्ययावत करताना नाव, वय, लिंग तसेच नातेसंबंधांतील काही विसंगती (-पेारश्रू) आढळून येत आहेत. या त्रुटी वेळेत दुरुस्त करून मतदारांना भविष्यात कोणताही त्रास होऊ नये, यासाठी निवडणूक प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येत आहे.

अ‍ॅनॉमली म्हणजे काय?
बीएलओ अ‍ॅपमध्ये माहिती नोंदविताना सिस्टीमकडून डेटामधील तांत्रिक त्रुटी अथवा विसंगती ओळखली जाते. अशा वेळी अ‍ॅपमध्ये त्रिकोणी इशारा दिसतो. त्या चिन्हावर क्लिक केल्यास विसंगतीचे नेमके कारण समोर येते.

प्रमुख विसंगती व आवश्यक कागदपत्रे

नाव, लिंग किंवा वयातील विसंगती
कारण : नाव, लिंग किंवा वयाची चुकीची नोंद

आवश्यक कागदपत्रे : जन्म दाखला
शाळा सोडल्याचा दाखला
एसएससी/एचएससी गुणपत्रिका
पासपोर्ट
स्वतःचे तसेच आई-वडिलांचे जन्मदिनांक नमूद असलेले शासकीय दस्तऐवज

वयातील फरकासंबंधी विसंगती

कारणे : पालक व मुलाच्या वयातील अंतर 15 वर्षांपेक्षा कमी किंवा 50 वर्षांपेक्षा जास्त असणे
आजी-आजोबा व नातवंडांच्या वयातील अंतर 40 वर्षांपेक्षा कमी असणे.
भावंडांच्या वयात संशयास्पद फरक किंवा मागील व सध्याच्या मतदार यादीतील वयातील विसंगती.

आवश्यक कागदपत्रे
जन्म दाखला
शाळा सोडल्याचा दाखला
गुणपत्रिका
पासपोर्ट
रेशन कार्ड (कुटुंब एकच असल्याचा पुरावा)

नातेसंबंध व पालकांच्या तपशीलातील विसंगती

कारणे :
मतदाराचे नाव पूर्वी आई किंवा जोडीदाराशी जोडलेले असून आता वडिलांशी जोडले जाणे.
एकाच व्यक्तीवर अनेक वंशजांनी दावा करणे.
मागील व सध्याच्या मतदार यादीतील पालक अथवा नातेवाईकांच्या तपशीलात तफावत असणे.

आवश्यक कागदपत्रे :
लग्न नोंदणी प्रमाणपत्र
रेशन कार्ड
मुलांचे जन्म दाखले
स्वतःचे व पालकांचे नाव नमूद असलेले शासकीय पुरावे
बीएलओ आणि मतदारांनी काय करावे?

मॅपिंगची पडताळणी
प्रथम बीएलओ यांनी माहिती नोंदविताना स्वतःकडून त्रुटी झाली आहे का, याची खात्री करावी.

कागदपत्रे सादर करणे : विसंगती योग्य असल्यास संबंधित मतदारांनी आवश्यक कागदपत्रे तातडीने बीएलओकडे जमा करावीत.

नोटीस व सुनावणी : प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर एउखछएढ प्रणालीद्वारे नोटीस पाठविली जाईल. त्यानंतर मतदार नोंदणी अधिकारी सुनावणीची तारीख व ठिकाण निश्चित करतील.

अंतिम कार्यवाही : सुनावणीदरम्यान बीएलओ यांनी गोळा केलेली कागदपत्रे ईआरओ यांच्याकडे सादर करण्यात येतील.

नागरिकांना आवाहन
मतदार नोंदीतील विसंगती दूर करण्यासाठी संबंधित बीएलओ संपर्क साधतील, त्या वेळी आवश्यक कागदपत्रे तत्काळ उपलब्ध करून सहकार्य करावे. त्यामुळे अंतिम मतदार यादीमध्ये नाव अचूक तपशीलासह कायम राहण्यास मदत होईल, असे भुसावळातील सामाजिक कार्यकर्ता सुनील जगन हिवाळे यांनी कळवले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !