भुसावळ विभागातील रेल्वे कर्मचार्‍यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार


भुसावळ (रविवार, 26 जुलै 2026) : भुसावळ विभागात रेल्वे कर्मचार्‍यांच्या गुणवंत पाल्यांचा उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल 25 रोजी गौरव करण्यात आला.

यावेळी इयत्ता 10 वी व 12 वीच्या बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केलेल्या रेल्वे कर्मचार्‍यांच्या 68 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल प्रशस्तीपत्र, पदक व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

या समारंभाचे प्रमुख अतिथी डीआरएम पुनीत अग्रवाल होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त आणि समर्पणाच्या बळावर यशाची नवी शिखरे गाठावीत, असे आवाहन त्यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांच्या यशामागील पालक आणि शिक्षकांच्या मोलाच्या योगदानाचेही त्यांनी विशेष कौतुक केले.

याच कार्यक्रमात राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक विजेती ममता लीलाधर सिंह कवर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !