गिरडगावला विद्यार्थ्यांसाठी बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे रास्तारोको आंदोलन आश्वासनानंतर आंदोलन मागे


यावल (सोमवार, 27 जुलै 2026) : विद्यार्थ्यांसाठी राज्य परिवहन (एसटी) बस थांबत नसल्याने गिरडगाव येथील विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत थेट रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे सुमारे एक तास रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. परिवहन मंडळाकडून विद्यार्थ्यांसाठी बस थांबवली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

काय घडले गिरडगावात ?
गिरडगाव येथून अनेक विद्यार्थी यावल, साकळी, किनगाव, चोपडा तसेच जळगाव येथे उच्च शिक्षणासाठी दररोज प्रवास करतात मात्र विद्यार्थ्यांना घेण्यासाठी एसटी बस गावात थांबत नसल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. वारंवार तक्रारी करूनही प्रश्न सुटत नसल्याने व सोमवारी देखील सकाळी काही बस न थांबता निघुन गेल्याने विद्यार्थी संतप्त झाले विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलनाचा मार्ग अवलंबला.

आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. तेव्हा यावल आगारातुन विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यात आली आणी विद्यार्थ्यांसाठी नियमितपणे एसटी बस थांबविण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सुमारे एक तासानंतर आंदोलन मागे घेत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दिलेल्या आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्याची अपेक्षा विद्यार्थी व पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !