भुसावळ नगरपालिकेत 1 ऑगस्टपासून आरोग्य शिबिर
जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त उपक्रमाचे आयोजन
जळगाव (गुरुवार, 30 जुलै 2026) : डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालय व भुसावळ श्री संत गाडगे महाराज नगरपालिका रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने 1 ते 10 ऑगस्ट या कालावधीत जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत भुसावळ नगरपालिका रुग्णालयात विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

यांची असेल उपस्थिती
या शिबीराचे उद्घाटन प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, सामाजिक कार्यकर्त्या रजनी सावकारे, भाजपाच्या जिल्हा सरचिटणीस डॉ. केतकी पाटील, आरोग्य सभापती मेघा वाणी मुख्याधिकारी विवेक धांडे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
या शिबिरात गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया, स्तनातील गाठींची तपासणी, गर्भवती महिलांसाठी आयर्न सुक्रोज इंजेक्शन यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या महिला रूग्णांवर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय येथे सवलतीच्या दरात सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या शिबिराचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.अधिक माहितीसाठी दिक्षा सुरे यांच्याशी 9689680901 या क्रमांकावर संपर्क साधावा.