गुरुपौर्णिमेनिमित्त डॉ.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेजमध्ये गुरुजनांचा गौरव
जळगाव (गुरुवार, 30 जुलै 2026) : गोदावरी फाउंडेशन संचालित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, जळगाव येथे आज दि. 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुजनांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच त्यांचे आशीर्वाद घेत कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी विद्यार्थ्यांनी गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करणारे मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे डीन डॉ. हर्षल बोरोले यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात गुरुचे स्थान अनन्यसाधारण असल्याचे सांगत, योग्य मार्गदर्शन, संस्कार आणि ज्ञानामुळेच विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडत असल्याचे प्रतिपादन केले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर, डॉ. वर्षा पाटील मॅडम आणि डॉ. वैभव पाटील सर यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व विद्यार्थी व शिक्षकांना शुभेच्छा देत आशीर्वाद दिले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक, विद्यार्थी तसेच नॉन-टीचिंग कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.