भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान


भुसावळ (गुरुवार, 30 जुलै 2026) : शहरातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच उत्साहात झाला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळेने आपल्या उत्कृष्ट यशाची परंपरा कायम राखत 100 टक्के निकालाची नोंद केली आहे. या परीक्षेत शाळेतील 235 विद्यार्थी परिक्षेला बसले होते. तब्बल 32 विद्यार्थ्यांनी ’10 सीजीपी मिळवून घवघवीत यश संपादन केले.

या सोहळ्याची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. व्यासपीठावर ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक, चेअरमन महेश फालक,कोषाध्यक्ष संजय नाहाटा आणि शाळेच्या प्राचार्या निना कटलर उपस्थित होते.
याप्रसंगी सर्व गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा विशेष सन्मान करण्यात आला.

श्रेयांश सिंग शाळेत प्रथम
या परीक्षेत शाळेतील श्रेयांश लक्ष्मीनारायण सिंग याने 97.2% गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा बहुमान पटकावला असून त्याच्या या उत्तुंग यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

शाळेतील ‘टॉपर फाईव्ह’ विद्यार्थी पुढीलप्रमाणे:
प्रथम क्रमांक: श्रेयांश लक्ष्मीनारायण सिंग (97.2%), द्वितीय क्रमांक हर्ष संजय छाबडिया आणि अनिश महेश चौधरी, तृतीय क्रमांक साहिल हेमंत महाजन, चौथा क्रमांक स्वरदा शेखर केर्‍हाळकर, पाचवा क्रमांक अन्वी उदय गोसावी आणि रणवीर जयसिंग महाजन यांनी मिळवला.

कौतुकाचा वर्षाव
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे मॅनेजमेंट तसेच प्राचार्या निना कटलर व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सूत्रसंचालन सोफिया पी बॉडी यांनी तर आभार हर्षला चौधरी यांनी मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !