जळगाव जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्टला


Jalgaon District-Level Democracy Day on August 3rd जळगाव (गुरुवार, 30 जुलै 2026) : जळगाव जिल्ह्यातील नागरिक आणि शेतकर्‍यांच्या विविध समस्यांचे निवारण करण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर ’लोकशाही दिन’ आयोजित केला जातो. त्यानुसार ऑगस्ट महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, 3 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत सभागृहात होत आहे.

नागरिकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर केलेला असेल आणि त्या अर्जासंदर्भात एका महिन्याच्या आत तालुकास्तरावरून कोणतेही उत्तर प्राप्त झाले नसेल, अशा वैयक्तिक हितसंबंधाच्या तक्रारींसह संबंधित नागरिकांनी जिल्हास्तरीय लोकशाही दिनास उपस्थित राहावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !