काँग्रेसच्या यावल तालुकाध्यक्षपदी प्रशांत पाटील यांची निवड


यावल (गुरुवार, 30 जुलै 2026) : यावल तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी किनगाव येथील प्रशांत भगवान पाटील यांची निवड करण्यात आली. ही निवड जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरी यांनी केली.

उल्लेखनीय कार्याची दखल
प्रशांत पाटील यांनी यापूर्वी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदावर कार्य केले आहे तसेच सामाजिक, सहकार व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. पंचायत समिती सदस्य, मधुकर सहकारी साखर कारखाना संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तसेच विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, किनगाव बुद्रुकचे संचालक म्हणून जबाबदार्‍या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांच्या पत्नी भारती प्रशांत पाटील या किनगाव बुद्रुकच्या माजी सरपंच आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे यावल तालुक्यात काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक बळकट होऊन पक्षाची विचारधारा व जनसंपर्क अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !