यावल एस.टी.आगाराचे व्यवस्थापक ईम्रान पठाण यांनी स्विकारला पदभार
यावल (गुरुवार, 30 जुलै 2026) : यावल एस.टी.आगारात नूतन आगार व्यवस्थापक म्हणून इम्रान पठाण यांची नियुक्ती करण्यात आली. नुकताच त्यांनी येथील आगारात पदभार स्विकारला.

प्रवाशांच्या अडचणी प्राधान्याने सोडवणार
प्रवाशांच्या अडचणींना प्रथम प्राधान्याने सोडवणे, प्रवासी व नागरीकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहात एस.टी.वरील नागरीकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहु, असे प्रसंगी ते म्हणाले.
दरम्यान गत चार वर्षांपासून कार्यरत तत्कालीन आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांची एरंडोल या ठिकाणी नुकतीच बदली झाली असून त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर रावेरात कार्यरत ईम्रान पठाण यांची यावल येथे बदली करण्यात आली.