भुसावळातील श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात थोर पुरुषांना अभिवादन
भुसावळ (शनिवार, 1 ऑगस्ट 2026) : शहरातील श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आली.

प्राचार्यांनी केले पूजन
प्राचार्य डॉ.रमेश जोशी यांच्याहस्ते लोकमान्य टिळकांच्या व अण्णाभाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. डॉ.रमेश जोशी म्हणाले की, टिळकांसारखी देशभक्ती व समर्पण भाव विद्यार्थ्यांनी आत्मसात करावा. इंग्रजांच्या जुलमी सत्तेला हाकलून देण्यासाठी, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे व तो मी मिळविणारच, असे ठणकावून सांगितले. टिळकांचे आदर्श जीवन हे सर्वांना प्रेरणादायी आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून वंचित समाजात जनजागृती घडवण्यासाठी आपल्या लेखणीतून साहित्य कादंबरी व पोवाडे लिहिले. आपले संपूर्ण जीवन तळागाळातल्या लोकांच्या उद्धारासाठी घालवले, असेही ते म्हणाले. कार्यक्रमात सर्व प्राध्यापक, सर्व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.