‘ब्रेकींग महाराष्ट्र’ चा आज भुसावळात सातवा वर्धापनदिन सोहळा : नवरत्नांचा होणार सन्मान
खाकीतील शिलेदारांचाही विशेष सेवा गौरव पुरस्काराने होणार सन्मान : मंत्री संजय सावकारे यांच्यासह प्रमुख लोकप्रतिनिधींची उपस्थिती
भुसावळ (रविवार, 2 ऑगस्ट 2026) : उत्तर महाराष्ट्रातील ‘सर्वात वेगवान, सर्वात विश्वसनीय’ ब्रीदवाक्य घेवून कार्यरत ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ या वेब न्यूज पोर्टलचा सातवा वर्धापनदिन सोहळा रविवार, 2 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी सहा वाजता शहरातील वांजोळा रोडवरील ‘राजवाडा’, स्टार लॉन येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा होत आहे.

सालाबादाप्रमाणे यंदादेखील वर्धापनदिनाचे औचित्य साधून समाजासाठी कार्य करणार्या नवरत्नांचा सन्मान तसेच भुसावळात सेवेत असताना विशेष कामगिरी करणार्या तीन अधिकार्यांचा विशेष सेवा गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
विविध क्षेत्रातील या नवरत्नांचा होणार गौरव
सामाजिक- योगेश पाटील
महिला सक्षमीकरण- सौ.आरतीताई चौधरी
यशस्वी संस्थाचालक- सौ.संगीताताई बियाणी
आरोग्य- प्रवीण पाटील
पर्यावरण- रफिक शेख
वैद्यकीय- डॉ.राजेश मानवतकर
सांस्कृतिक- उमेश नेमाडे
शैक्षणिक- प्राचार्य आर.पी.फालक
यशस्वी उद्योजक- सारंगधर पाटील
विशेष सेवा गौरव सन्मान
श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, जळगावचे अपर अधीक्षक संदीप गावीत, पुणे टास्क फोर्सचे पोलीस उपायुक्त कृष्णात पिंगळे यांचा सन्मान होार आहे.
यांची मान्यवरांची कार्यक्रमास उपस्थिती
जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार एकनाथराव खडसे, जळगावचे आमदार राजूमामा भोळे, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, यावल-रावेरचे आमदार अमोल जावळे, विधान परिषद आमदार नंदकिशोर महाजन, भुसावळचे पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजाताई नारखेडे, यावल नगराध्यक्षा छायाताई पाटील, भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनीताई सावकारे, भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा मा.डॉ.केतकीताई पाटील, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फालक, जळगाव जिल्हा ग्रामीण पूर्व काँग्रेस जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरी, भुसावळातील भाजपा गटनेता युवराज लोणारी, श्री श्री 1008 श्री महामंडलेश्वर श्री.पवन कुमार दासजी महाराज, (श्री खंडेराववाडी देवस्थान, फैजपूर), स्वामी स्वयंमप्रकाशदासजी कोठारी (स्वामी नारायण मंदिर, सावदा), श्री स्वामी ब्रह्मानंद (श्री महंत श्री दत्त गिरणारी मठ, भुसावळ), माजी प्रभारी नगराध्यक्ष विजय चौधरी, दैनिक जनशक्तीचे संपादक त्र्यंबक कापडे, लाईव्ह ट्रेण्ड न्यूजचे संपादक शेखर पाटील आदींची उपस्थिती असणार आहे.
कार्यक्रमास उपस्थिती द्यावी, असे आवाहन ब्रेकींग महाराष्ट्रचे संपादक अमोल देवरे व कार्यकारी संपादक गणेश वाघ (90213-10269) यांनी केले आहे.