जळगाव पोलिसांचा अभिनव उपक्रम : उमेद – उद्याची पहाट 2026

बालविधीसंघर्षग्रस्त मुलांना नवजीवनाची दिशा


जळगाव (सोमवार, 3 ऑगस्ट 2026) : जळगाव पोलीस विधी संघर्ष ग्रस्त बालकांसाठी उपक्रम जिल्हा व सत्र न्यायालय जळगाव न्यायाधीश आर. एन. जोशी व जळगाव पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या विचारातून तसेच निरीक्षण गृह, आधार बहुउद्देशीय संस्था व केशव स्मृती प्रतिष्ठान जळगाव यांच्या सहकार्यातून आज विधी संघर्ष सह जीवन जगणार्‍या तसेच भारतचे भविष्य असणार्‍या मुलांसाठी उमेदउद्याची पहाट कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.

यावेळी मुलांना नवीन दिशा, नवीन विचार, आत्मविश्वास, लढण्याची ताकत, परिश्रम, शिक्षण, मेहनत, मैत्री पूर्ण संबंध, नवीन प्रेरणा, गप्पा गोष्टी, खेळाच्या माध्यमातून विचार परिवर्तन, प्रश्न उत्तर घेऊन विजेत्या चा सत्कार बक्षीस वितरण करून सन्मान करण्यात आला.

अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे, अमित माळी, संघपाल तायडे, निरीक्षण गृहचे रवी किरण अहिरराव, दिगंबर पाटील ,राहुल भालेराव, प्रशांत, व सहकारी यांनी सहभाग घेतला. महिला व बालक सहाय्य कक्ष, जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन प्रकल्प ,आधार बहुउद्देशीय संस्था प्रतिनिधी विद्या सोनार, आनंद पगारे, भाग्यश्री, मोहिनी धनगर, सुनील जगन हिवाळे यांचेसह स्वयंसेवक सहभागी झाले होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !