भुसावळात 7 ऑगस्टपासून धार्मिक सप्ताह आचार्य आनंदऋषीजी म.सा.जन्मजयंती निमित्त विविध कार्यक्रम
भुसावळ (बुधवार, 5 ऑगस्ट 2026) : राष्ट्रसंत,आचार्य भगवंत प.पू. आनंदऋषीजी म.सा.यांची जन्मजयंती गुरुवार, 13 ऑगस्ट रोजी संपूर्ण भारतभरात मोठ्या उत्साहात आणि विविध धार्मिक कार्यक्रमांद्वारे साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने भुसावळ शहरात 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट या कालावधीत भव्य धार्मिक सप्ताह साजरा करण्याचा निर्णय जैन श्रीसंघाने घेतला आहे.

हा संपूर्ण सप्ताह प.पू.गुरुमाई सम्यक दर्शनाजी म.सा.आदी ठाणे तीन यांच्या मंगलमय सानिध्यात सुराणा साधना भवन येथे संपन्न होणार आहे. या धार्मिक सप्ताहा दरम्यान जप, तप,आराधना,उपवास,तेल (तेलाभिषेक) तसेच सामूहिक सामायिक आणि गुणगौरव प्रार्थना यांसारख्या अनेक आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
असे असेल दैनंदिन नियोजन
सकाळी 6.30 वाजता सामूहिक प्रार्थना
सकाळी 8.45 ते 10 वाजता प्रवचन
दुपारी 2 ते 4 वाजता धार्मिक चर्चा
सायंकाळी: सामूहिक प्रतिक्रमण
दरम्यान, या सर्व धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहून गुरुदर्शनाचा आणि प्रवचन श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीसंघातर्फे संघपती जयंतीलाल सुराणा, जे.बी.कोटेचा, अतुल ताथेड, गौतम चोरडिया आणि कांतीलाल चोरडिया यांनी केले आहे.