सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांचा ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरव

परदेशी-राजपूत-मीना समाज सेवाभावी संघटनेकडून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव


भडगाव (गुरुवार, 6 ऑगस्ट 2026) : छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस आयुक्त कार्यालयात 31 जुलै रोजी आयोजित समारंभात सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त अशोक लालसिंग राजपूत यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्याहस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या प्रदीर्घ, प्रामाणिक आणि उल्लेखनीय पोलीस सेवेसह सामाजिक योगदानाची दखल घेत त्यांना यावेळी ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

राज्यभरातील विविध ठिकाणी सेवा
अशोक राजपूत यांनी सन 1992 मध्ये नागपूर येथे उपनिरीक्षक म्हणून महाराष्ट्र पोलीस दलात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी विविध ठिकाणी जबाबदारीची पदे समर्थपणे सांभाळली. मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, स्थानिक गुन्हे शाखा तसेच पनवेल येथील सेवेनंतर छत्रपती संभाजीनगर येथे सहायक पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.

कर्तव्यनिष्ठ सेवेसाठी त्यांना सन 2010 मध्ये पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले तसेच 2022 मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते प्रतिष्ठेचे पोलीस पदक देऊन गौरविण्यात आले. याशिवाय विविध वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडून त्यांना 700 हून अधिक बक्षिसे आणि 150 प्रशस्तीपत्रे प्राप्त झाली असून त्यांच्या कार्याचा अनेक स्तरांवर गौरव करण्यात आला आहे.

याप्रसंगी परदेशी-राजपूत-मीना समाज सेवाभावी संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अशोक राजपूत यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश परदेशी, जिल्हा सचिव विनोद महेर, भडगाव तालुकाध्यक्ष अशोक परदेशी, पाचोरा तालुका अध्यक्ष इंदल गोठवाल, जामनेर तालुका अध्यक्ष अमोल कायठे, सोयगाव तालुकाध्यक्ष दिलीप मचीये, चाळीसगाव तालुका अध्यक्ष भगवान महेर, कन्नड तालुका अध्यक्ष प्रकाश चांदा, तंटामुक्ती जिल्हाध्यक्ष विनोद जोनवाळ, उपाध्यक्ष भगवान डेडवाल तसेच जिल्हा व तालुकास्तरीय सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.

यावेळी समाज बांधवांनी अशोक राजपूत यांच्या प्रामाणिक, निःस्वार्थ आणि कर्तव्यदक्ष सेवेला सलाम करत त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठीही शुभेच्छा दिल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !