भुसावळात सोमवारी टेनिस बॉल क्रिकेटची निवड चाचणी
14 वर्षांखालील व खुल्या गटातील मुला-मुलींची होणार निवड
भुसावळ (शुक्रवार, 7 ऑगस्ट 2026) : महाराष्ट्र राज्य टेनिस बॉल क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने नागपूर येथे 21 ते 23 ऑगस्टदरम्यान सेंट मेरी स्कूलच्या मैदानावर 14 वर्षांखालील व खुल्या गटातील राज्य अजिंक्यपद टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील मुला-मुलींचा संघ सहभागी होणार आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा संघाची निवड करण्यासाठी 14 वर्षांखालील व खुल्या गटातील मुला-मुलींची निवड चाचणी सोमवार, 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता सेंट अॅलायसीस शाळेच्या मैदानावर घेण्यात येणार आहे.


निवड चाचणीसाठी सहभागी होणार्या खेळाडूंनी वयाच्या दाखल्याची छायांकित प्रत सोबत आणावी. तसेच सर्व खेळाडूंनी क्रिकेटच्या गणवेशात उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी 9673171786 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मेघशाम शिंदे, प्रा. संजय चौधरी, प्रा.आनंद उपाध्याय, प्रदीप साखरे व जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे सचिव वासेफ पटेल यांनी केले आहे.
