पाडळसे जिल्हा परिषद उर्दू शाळेतील विद्यार्थीनींचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
यावल (शुक्रवार, 7 ऑगस्ट 2026) : यावल तालुक्यातील पाडळसे येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थीनींनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवले.
शाळेतील विद्यार्थिनी आफरीन मोहसीन टकारी आणि अलवीरा गुलाब टकारी या विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती परिक्षा पास करीत त्या गुणवत्ता यादी आल्या आहे. विद्यार्थिनींचा त्यांच्या पालकांसमवेत तसेच इयत्ता चौथीला मार्गदर्शन करणारे शिक्षक आरिफ खान यांचा शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला.


प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सैय्यद इरफान, उपाध्यक्ष गुलाब टकारी, सदस्य मोहसीन पठाण, सैय्यद ईसाक, माता-पालक गटाचे मीनाबी सय्यद एजाज, मुमताजबी सैय्यद, सैय्यद इसाक, शिक्षक आरिफ खान, शमीम तडवी, रोशन खान, नईम शेखसह शिक्षक वृंद उपस्थित होते.
