भुसावळातील श्री रामेश्वर महादेव मंदिर परिसरात वृक्षारोपण
भुसावळ (सोमवार, 10 ऑगस्ट 2026) : शहरातील श्री रामेश्वर महादेव मंदिर परिसर, ऑक्सीजन पार्क भागात नगराध्यक्षा शैलजा नारखेडे व प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे, नगरसेवक राजेंद्र आवटे, भाजपा गटनेता युवराज लोणारी, नगरसेविका शोभा इंगळे, समाजसेवक सारंगधर पाटील (छोटूभाऊ) यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी नगरसेविका सीमा नरवाडे, राहुल तायडे, अंकिता मनीष पाटील, अध्यक्ष प्रल्हाद पवार, उपाध्यक्ष धनंजय आंधळे, डी.के.सोनी, दिवाकर मोरे, सुरेंद्र वराडे, सचिन परदेशी, रवी शुक्ला, खांडेकर काका, सौरभ अग्रवाल, अतुल कुलकर्णी, श्रीकांत सूर्यवंशी, अनिल अग्रवाल, प्रवीण बोर्डे, मनोहर चंदन, राजेश कामेलो, सन्मानीय मंडळाचे सर्व कार्यकर्ते व महिला मंडळ, विठाबाई पवार, नीलम आंधळे, संध्या सोनी, पूजा अग्रवाल, योगीता सूर्यवंशी, अंकिता पाटील, अनिशा अग्रवाल, दीपाली थोरात, दीपाली चंदन, अरुणा कामेलो इतर महिला मंडळाचे सदस्य व पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.



