भुसावळातील ऑर्डनन्स फॅक्टरीत देशव्यापी विरोध दिन
भुसावळ (सोमवार, 10 ऑगस्ट 2026) : केंद्रीय कर्मचारी महासंघचे निर्देश व अखिल भारतीय संरक्षण महासंघाच्या आदेशानुसार सोमवार, 10 ऑगस्ट 2026 रोजी सरकारचे कामगार विरोधी धोरण व प्रलंबित मागण्याच्या साठी देशव्यापी विरोध दिवस साजरा करण्यात आला.
मुख्य गेटवर कामगारांची निदर्शने
शहरातील आयुध निर्माणी भुसावळ येथे मुख्य गेटवर युनियन पदाधिकारी पदाधिकारी एकत्रित येऊन निदर्शने करीत कामावर जाणार्या प्रत्येक कामगाराला काळे बिल्ले लाऊन प्रलंबित मागण्यासाठी विरोध दिवसात सहभागी होण्याचे आवाहन केले. कामगारांनी त्यास उस्फुर्त प्रतिसाद देत दिवस भर काळे बिल्ले लाऊन कार्य केले व देशव्यापी विरोध दिवस यशस्वी केला.




या आहेत प्रमुख मागण्या
सरकारद्वारे लागू केलेले चार कामगार कायदे रद्द करीत जुने कायदे लागू करावेत, संरक्षण, रेल्वे, परमाणु ऊर्जा, अंतरीक्षसह सर्व केंद्रीय विभागांमध्ये सरकारी नोकर भरती सुरू करावे, संरक्षण क्षेत्रासह अन्य केंद्रीय विभागातील ठेकेदारी, टर्म बेसिस भरतील कर्मचार्यांना केंद्रीय सेवेत कायम करावे, केंद्रीय कर्मचार्यांना लागू नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना पुन: बहाल करण्यात यावी, आयुध निर्माणीतील अनुकंपा भरती वरील बंदी उठवून अकस्मात मृत कर्मचार्यांच्या वारसांना सेवेत समावेश करण्यात यावा, आठवा वेतन आयोग 01 जानेवारी 2026 पासून लागू करून 3.83 फिटमेंट फॉर्मुल्यासह कमीत कमी 69000/- बेसिक देण्यात यावे, 69 लाख पेन्शनर्स व फॅमिली पेन्शनर्स लाही आठव्या वेतन आयोगातही सुधारित पेन्शन लाभ कायम ठेवण्यात यावा आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
यांचा आंदोलनात सहभाग
यशस्वीतेसाठी युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड आशिष मोरे, कार्याध्यक्ष निलेश देशमुख, संतोष बाविस्कर, किशोर बढे, गजानन इंगळे, मिलेश देवराळे, योगेश आंबोडकर, प्रवीण मोरे, मिलिंद ठोंबरे, नवल भिडे, राजेंद्र जैन, विवेक नेहेते, कुणाल सोनवणे, विनोद धाडे, धनंजय पिंपळे, बिस्मिल्लाह तडवी, शेख शकील, मोहन सपकाळे, दीपक पाटील, राजेंद्र तडवी, नितीन देशमुख यांच्यासह सर्व पदाधिकार्यांनी सहभाग नोंदवला, आंदोलन कॉ.दिनेश राजगिरे महासचिव यांच्या नेतृत्वात यशस्वीरित्या झाले.