भुसावळात 16 रोजी ‘लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल’ नाटीकेचे आयोजन

स्वातंत्र्यदिनानिमित्त शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळाचा उपक्रम


भुसावळ (सोमवार, 10 ऑगस्ट 2026) : दरवर्षीप्रमाणे यंदाही 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेल्या शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे ‘अखंड भारताचे शिल्पकार लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल’ यांच्या जीवनावर आधारित विशेष नाटीकेचे सादरीकरण केले जाणार आहे. स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

नव्या पिढीला मिळेल प्रेरणा
या नाटिकेच्या माध्यमातून लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचा आणि देशाच्या एकात्मतेसाठी त्यांनी केलेल्या कार्याचा परिचय उपस्थितांना करून दिला जाणार आहे. विशेषतः नव्या पिढीला लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याची माहिती व्हावी आणि त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. भुसावळ शहरातील संतोषी माता सभागृहात रविवार, 16 रोजी सायंकाळी सहा वाजता या नाटीकेचे सादरीकरण केले जाणार आहे. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या सहकार्यातून नाटीकेचे सादरीकरण केले जात असून त्यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.





भुसावळकरांना उपस्थितीचे आवाहन
भुसावळकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नाटिकेचा लाभ घ्यावा, असे प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे व सहकार्‍यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !