रॅगिंग गंभीर गुन्हा : कैदेसह दंडाची शिक्षा : भुसावळात अॅड.प्रिया अडकमोल
प.क.कोटेच्या महिला महाविद्यालयात रॅगिंगमुक्त व सुरक्षित परिसर या विषयावर मार्गदर्शन
Ragging Awareness Program at P.K. Kotecha Women’s College भुसावळ (मंगळवार, 11 मंगळवार 2026) : रॅगिंग हा एक गंभीर गुन्हा असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. रॅगिंग केल्यास विद्यार्थ्याचे शैक्षणिक भविष्य उद्ध्वस्त होऊ शकते आणि कायद्यानुसार कारावास व दंडाची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती अॅड. प्रिया अडकमोल यांनी येथे दिली. भुसावळातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात रॅगिंगमुक्त व सुरक्षित परिसर या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.
रॅगिंग विरोधात जनजागृती
महाविद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी अँटी रॅगिंग व इंटरनल कंप्लेंट कमिटीतर्फे आयोजित रॅगिंग आणि लैंगिक छळवणूकविरोधी जनजागृती कार्यक्रम मंगळवार, 11 रोजी झाला.



रॅगिंग समितीचे समन्वयक प्रा.माधुरी भुतडा यांनी विद्यार्थ्यांमध्ये रॅगिंगचे दुष्परिणाम आणि कायदेशीर शिक्षा याबाबत जनजागृती करणे हा समितीचा उद्देश असल्याचे सांगितले. प्रभारी प्राचार्य डॉ मीना चौधरी अध्यक्षस्थानी होत्या.
यांची होती उपस्थिती
पर्यवेक्षक स्वाती भोळे, प्रा.वसंत खरे, प्रा.श्वेता नागला उपस्थित होते.
महाविद्यालयात झिरो टॉलरन्स धोरण
प्राचार्य चौधरी म्हणाल्या की, महाविद्यालयात झिरो टॉलरन्स धोरण राबवले जाते. विद्यार्थिनींनी स्वतःला इतके सक्षम आणि कणखर बनवावे की, त्यांचा कुणीही कुठल्याही प्रकारे छळ करू शकणार नाही. यावेळी विद्यार्थिनी व प्राध्यापकांनी मिळून कधीही रॅगिंग करणार नाही आणि रॅगिंग होऊ देणार नाही, अशी शपथ घेतली.
जनजागृतीपर पोस्टरचे प्रदर्शन
हर्षदा जाधव व हर्षदा लोहार, कुमेघा सोनवणे या विद्यार्थिनींनी सेक्चूअल हॅरेशमेंट जनजागृती पोस्टर प्रदर्शित केले. समिती सदस्य प्रा.दीपाली पाटील, प्रा.भावना संकोपाल, सानिका आहेर, ममता जवरे यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन जयश्री सोनवणे तर आभार प्रदर्शन रक्षंदा जैन यांनी मानले.