भडगावातील शुभांगी परदेशी यांची ठाणे जलसंधारण अधिकारीपदी निवड
Bhagaon’s Shubhangi Pardeshi-Maher Selected as Water Conservation Officer in Thane Zilla Parishad भडगाव (मंगळवार, 11 मंगळवार 2026) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागाच्या विविध पदाकरीता भरतीसाठी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत भडगावातील शुभांगी अमोल महेर यांची ठाणे जिल्हा परिषदेत जलसंधारण अधिकारी पदाकरीता निवड झाली.
भडगाव शहराचा वाढला नावलौकीक
शुभांगी परदेशी-महेर या भडगाव पालिकेचे माजी नगराध्यक्ष गणेश परदेशी यांच्या कन्या तर नाशिक सहा.आयुक्त सुदाम परदेशी यांच्या पुतणी आहेत. त्यांच्या यशाबाबत आमदार किशोर पाटील यांच्यासह परिसरातील सर्व स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



शुभांगी परदेशी यांनी डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग , आकुर्डी पुणे येथून बी.ई.सिव्हीलची पदवी घेतली असून सध्या नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत निफाड पंचायत समिती येथे सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट म्हणून कार्यरत आहेत.
निवडीनंतर शुभेच्छांचा वर्षाव
भडगावच्या कन्येने नोकरी करीत असतांना पुन्हा जलसंधारण विभागाची परीक्षा देऊन ठाणे जिल्हा परीषद विभागात जलसंधारण अधिकारी या पदावर झेप घेतलेली आहे. या निवडीबद्दल शुभांगी परदेशी यांचे परदेशी, राजपुत, मीणा समाज संघटना जिल्हाध्यक्ष सुरेश कोंडु परदेशी, जिल्हा सचिव विनोद महेर, तंटामुक्ती जिल्हाध्यक्ष विनोद जोनवाळ, उपाध्यक्ष भगवान डेडवाळ यांच्यासह जिल्ह्यातील समाजाचे भडगाव तालुकाध्यक्ष अशोक परदेशी, पाचोरा तालुकाध्यक्ष इंदलसिंग गोठवाळ, जामनेर तालुकाध्यक्ष अमोल कायठे, सोयगाव तालुकाध्यक्ष दिलीप मचीये, चाळीसगाव तालुकाध्यक्ष भगवान महेर, कन्नड तालुकाध्यक्ष प्रकाश चांदा तसेच समाजाच्या सर्व कार्यकारणी सदस्य, पदाधिकारी व समाज बांधवांच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.