गोंडगाव विद्यालयात शिक्षक-पालक सभा उत्साहात


भडगाव (बुधवार, 12 ऑगस्ट 2026) : रा. स. शि. प्र. मंडळ संचलीत माध्यमिक विदयालय गोंडगाव विवद्यालयात मंगळवार, 11 रोजी सकाळी 9 वाजता शिक्षक-पालक सभा झाली. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.जी.नन्नावरे होते.

यांची होती उपस्थिती
लोकनियुक्त सरपंच राहुल पाटील, ग्रामपंचायत सदस्य मनोज पाटील, विक्रम पाटील, जितेंद्र पाटील, ललित मांडोळे व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी गावातील पालकवर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.




पदाधिकार्‍यांचा केला सन्मान
यावेळी मान्यवरांसह पालकांचा, शिक्षक पालक सभेच्या निवड झालेल्या पदाधिकार्‍यांचा पुष्पगुच्छ देउन सत्कार विद्यालयातर्फे करण्यात आला. विद्यालयात वृक्ष लागवडीसाठी 100 वृक्ष देऊन अनमोल सहकार्य लाभलेल्या बांबरुड प्र. ब. येथील वृक्षमित्र नरेंद्र परदेशी, खड्डे खोदण्यासाठी जेसीबी मशीनची सोय उपलब्द करुन दिल्याबद्दल लोकनियुक्त सरपंच राहुल पाटील व वृक्ष लागवडीसाठी विशेष सहकार्य लाभल्याबद्दल शशिकांत पाटील, जितेंद्र पाटील यांचा विद्यालयामार्फत पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

पदाधिकार्‍यांची निवड
प्रास्तविक एस.आर.पाटील तर सूत्रसंचालन एस.आर.महाजन यांनी केले. यावेळी शिक्षक-पालक संघाच्या उपाध्यक्षपदी जितेंद्र शालिग्राम पाटील यांची पुनश्च निवड करण्यात आली. सचिवपदी एस.आर.पाटील, सहसचिवपदी विश्वास रंगराव पाटील यांची निवड करण्यात आली. यावेळी शिक्षक-पालकांनी विविध विषयांवर चर्चा केली.

विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.जी.नन्नावरे यांनी शाळेत राबविण्यात येणार्‍या शैक्षणिक व अडीअडचणी मांडून विविध विषयांवर सविस्तर माहिती दिली. आभार ए.एम.साळुंखे यांनी मानले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !