गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक अवयवदान दिन उत्साहात साजरा


जळगाव (गुरुवार, 13 ऑगस्ट 2026) : गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे वैद्यकीय-शल्यचिकित्सा परिचर्या विभागाच्या वतीने झकउ, नशिराबाद येथे जागतिक अवयवदान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रा.मनोरमा कश्यप यांच्या नेतृत्वाखाली हा जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावर्षीच्या कार्यक्रमाची संकल्पना अवयवदान-जीवनाची अनमोल भेट अशी होती. अवयवदानाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविणे आणि नागरिकांमध्ये अवयवदानाबाबत जनजागृती निर्माण करणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.






यावेळी 40 परिचर्या विद्यार्थ्यांच्या सहभागाने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी अवयवदानाचे महत्त्व सांगणारे पोस्टर्स, फलक व प्रभावी घोषवाक्ये हातात घेऊन परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृती केली. विद्यार्थ्यांनी नागरिकांशी संवाद साधून अवयवदानाचे महत्त्व समजावून सांगितले तसेच संभाव्य अवयवदाता होण्याचे आवाहन केले.

महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा.डॉ.विशाखा गणवीर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत त्यांच्या सक्रिय सहभागाचे कौतुक केले. तसेच प्रा. जॅसिंथ धाया यांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन केले, तसेच यांनी वैद्यकीय-शल्यचिकित्सा परिचर्या विभागाचे व सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे यशस्वी कार्यक्रमाबद्दल अभिनंदन केले.

एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे अनेकांना नवजीवन मिळू शकते, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. समाजामध्ये अवयवदानाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी हा जनजागृतीपर उपक्रम प्रभावी ठरला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !