रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा : तीन रेल्वे गाड्यांना आता अतिरिक्त वातानुकूलित द्वितीय श्रेणी कोच


भुसावळ (शनिवार, 15 ऑगस्ट 2026) : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खालील एक्सप्रेस गाड्यांना तात्पुरत्या स्वरूपात एक अतिरिक्त वातानुकूलित द्वितीय श्रेणी कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

गाडी क्र. 22685/22686 यशवंतपूर-चंदीगड-यशवंतपूर एक्सप्रेस
गाडी क्र. 22685 यशवंतपूर येथून दिनांक 05 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर 2026 पर्यंत तसेच गाडी 22686 चंदीगड येथून 08 सप्टेंबर ते 06 ऑक्टोबर 2026 पर्यंत एक अतिरिक्त वातानुकूलित द्वितीय श्रेणी कोच जोडण्यात येणार आहे.





गाडी क्रमांक 12630 हजरत निजामुद्दीन येथून 19 ऑगस्ट 2026 ते 2 ऑक्टोबर 2026 पर्यंत एक अतिरिक्त वातानुकूलित द्वितीय श्रेणी कोच जोडण्यात येणार आहे.

गाडी क्रमांक 22687/22688 म्हैसूर-वाराणसी-म्हैसूर एक्सप्रेस
गाडी क्रमांक 22687 म्हैसूर येथून 3 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत तसेच गाडी क्रमांक 22688 वाराणसी येथून 5 सप्टेंबर 2026 ते 3 ऑक्टोबर 2026 पर्यंत एक अतिरिक्त वातानुकूलित द्वितीय श्रेणी कोच जोडण्यात येणार आहे.

गाडी क्रमांक 17323 हुबळी येथून 11 सप्टेंबर 2026 ते 2 ऑक्टोबर 2026 पर्यंत तर गाडी क्रमांक 17324 बनारस येथून 13 सप्टेंबर 2026 ते 4 ऑक्टोबर 2026 पर्यंत एक अतिरिक्त वातानुकूलित द्वितीय श्रेणी कोच जोडण्यात येणार आहे.

प्रवाशांनी या अतिरिक्त सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !