वाडे येथे पालखी व ग्रंथ दिंडी मिरवणूक


Wade in Bhadgaon Celebrates 731st Sanjeevani Samadhi Ceremony of Sant Shiromani Savata Maharaj भडगाव (शनिवार, 15 ऑगस्ट 2026) : भडगाव तालुक्यातील वाडे येथे संत शिरोमणी सावता महाराज यांच्या 731 व्या संजीवनी समाधी सोहळयानिमित्त अखंड हरीनाम किर्तन सप्ताह व श्री. ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण वाचन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

नामवंत कीर्तनकारांची कीर्तने
यात हभप प्रथमेश महाराज मुणदवाडकर, हभप सावता महाराज मोहाडी, हभप किशोर महाराज कासोदे, हभप जनार्दन महाराज मराठखेडे, हभप पुंडलिक महाराज पंढरपूर, हभप परमेश्वर महाराज गोंडखेल, हभप एकनाथ महाराज सदगीर यांचे कीर्तन झाले





बुधवार, 12 रोजी सकाळी 8.30 वाजता हभप एकनाथ महाराज सदगीर यांचे काल्याचे कीर्तन झाले. श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण वाचन व्यासपिठ हभप प्रभाकर महाराज मलकापुर यांनी केले.

सर्व धार्मिक कर्यक्रम वाडे येथील गणपती नगरात पार पडले. मंगळवार, 11 रोजी सकाळी पालखी व ग्रंथ मिरवणुक टाळमृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाच्या जयघोषात गावातून काढण्यात आली. या मिरवणुकीत ग्रामस्थ, महिला भाविकांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.

12 रोजी सकाळी 11 वाजता श्री संत सावता महाराज मंगल कार्यालयात महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. यावेळी पत्रकार अशोक बापू परदेशी यांनी भेट देऊन दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. यावर्षी महाप्रसादाचे दातृत्व कै. हभप. सुरेश सुदाम माळी यांच्या स्मरणार्थ कल्पनाबाई सुरेश माळी या परीवारामार्फत करण्यात आले.

किर्तनांसह महाप्रसादाचा लाभ भाविकांनी मोठया संख्येने घेतला. हा सप्ताह पार पाडण्यासाठी ग्रामस्थ, तरुण मंडळी, महिला, समाजबांधव या आयोजकांनी परीश्रम घेतले. ग्रामस्थ, नागरीक, भजनी मंडळ, वारकरी मंडळी, समाजबांधवांचे अनमोल सहकार्य लाभले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !