भुसावळातील द वर्ल्ड स्कूलमध्ये देशभक्तिपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम


भुसावळ (शनिवार, 15 ऑगस्ट 2026) : कोलते फाउंडेशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन संचलित द वर्ल्ड स्कूल, भुसावळ येथे 15 ऑगस्ट रोजी भारताचा 80वा स्वातंत्र्यदिन देशभक्तिपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे चेअरमन निनशिकांत व्ही. कोलते यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संचालिका राजश्री एन. कोलते व मुख्याध्यापिका पेट्रीशिया सी. हैसेट उपस्थित होत्या.

राष्ट्रगीतानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते, भाषणे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.





यावेळी चेअरमन निशिकांत व्ही. कोलते यांनी विद्यार्थ्यांना देशाच्या प्रगतीत योगदान देणारे आणि जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन केले. मुख्याध्यापिका पेट्रीशिया सी. हैसेट यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समन्वयक, पर्यवेक्षिका, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !