भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात


भुसावळ (शनिवार, 15 ऑगस्ट 2026) : स्वातंत्र्यदिनानिमित्त शहरातील के. नारखेडे विद्यालयाच्या आवारात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी पी.व्ही.पाटील यांच्याहस्ते शनिवारी सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय गीत वन्दे मातरमपासून करण्यात आली. नंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उपस्थितांनी राष्ट्रगीत व राज्य गीत गायले.

यांची होती उपस्थिती
यावेळी संस्थेचे ऑनररी जॉईंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस.ए.अडकमोल, उपमुख्याध्यापक एस.पी.पाठक, पर्यवेक्षक एस.एल.राणे, बी.बी.जोगी, संगणक विभागप्रमुख बी.ए.पाटील, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.





उद्देशिका वाचन व शपथ
ध्वजारोहणानंतर उपमुख्याध्यापक एस.पी.पाठक यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे स्वतः वाचन केले व विद्यार्थ्यांकडून सामूहिक वाचन करवून घेतले. त्यानंतर एम.व्ही.गरुडे यांनी सर्वांना तंबाखू मुक्तीची शपथ दिली, एस.पी.महाजन यांनी कॉपीमुक्तीची शपथ दिली. विद्यार्थ्यांनी देशहितासाठी हे संकल्प पाळण्याचा निर्धार व्यक्त केला.

सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत
संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या समूहगीताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रिया घेटे, वैष्णवी मोगरे, आकांक्षा जाधव यांच्यासह सकाळ शाखेच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी संगीत शिक्षक डी.एम.हेलोडे, एम.व्ही.कुलकर्णी, तबलावादक विद्यार्थी सुदीक्षण चौधरी यांच्या सुरेख साथसंगतीने देशभक्तीपर गीत सादर केले. कृष्णा नाले, सुजल जावळे आणि कार्तिक झांबरे यांनी स्वातंत्र्य, कर्तव्य आणि युवा पिढीची जबाबदारी या विषयांवर आपले विचार मांडले. ध्वजारोहणाचे संचालन एन.पी.नेहेते, एन.ए.नेमाडे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.टी.चौधरी यांनी केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !