भुसावळातील विवेकानंद विद्यामंदिरात स्वातंत्र्य दिन उत्साहात


भुसावळ (शनिवार, 15 ऑगस्ट 2026) : विवेकानंद बहुउद्देशीय संस्था संचलित विवेकानंद विद्यामंदिरात भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तिपर कार्यक्रम सादर करून स्वातंत्र्य दिनाचा उत्साह द्विगुणित केला.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विवेकानंद सोसायटीचे अध्यक्ष मनोज शालिग्राम तोतला उपस्थित होते. यावेळी संस्थाध्यक्ष जयंतीलाल सुराणा, उपाध्यक्ष अक्षय सराफ, सचिव प्रसन्न गंधे, संचालक मंडळातील नरेंद्र अकोले, संजय चौधरी, चेतन शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा खरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.





देशभक्तीपर वातावरण
मनोज शालिग्राम तोतला यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीताने वातावरण देशभक्तीने भारावून गेले. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन, देशभक्तिपर गीते तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले.

यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व, राष्ट्राप्रती असलेली जबाबदारी आणि देशाच्या प्रगतीमध्ये विद्यार्थ्यांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी केलेला त्याग आणि बलिदान यांचे स्मरण ठेवून देशाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विवेकानंद सोसायटीच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आनंदाने खाऊचा आस्वाद घेतला. या उपक्रमामुळे स्वातंत्र्य दिनाचा आनंद विद्यार्थ्यांसाठी अधिकच द्विगुणित झाला.

यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांचा उत्साह, देशभक्तीची भावना आणि शिस्तबद्ध सहभाग यामुळे संपूर्ण परिसरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साहपूर्ण माहोल निर्माण झाला. देशभक्तीचा जागर, विद्यार्थ्यांचा उत्साह आणि राष्ट्रप्रेमाची भावना जागविणारा हा स्वातंत्र्य दिन सोहळा अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात झाला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !