भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना मानवंदना
भुसावळ (शनिवार, 15 ऑगस्ट 2026) : शहरातील दि भुसावळ पीपल्स चॅरिटेबल संस्था संचलित दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात देशाचा 80 वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजू फालक यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले.
राष्ट्रगीताचा जयघोष
यावेळी सातारा जिल्ह्यातील न्या.संजय बुंदेले, समाजसेवक प्रवीण भोळे उपस्थित होते. राष्ट्रगीताच्या जयघोषाने संपूर्ण परिसर राष्ट्रप्रेमाने भारावून गेला होता. ध्वजारोहणाप्रसंगी विद्यार्थ्यांनी वंदे मातरम, राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत, देशभक्तिपर गीते सादरीकरण करून स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना आणि स्वातंत्र्यसैनिकांना मानवंदना दिली.




देशाच्या प्रगतीत तरुणांची भूमिका महत्त्वाची
प्राचार्य डॉ.राजू फालक यांनी स्वातंत्र्याचे महत्त्व, नागरिकांची राष्ट्राप्रती असलेली कर्तव्ये आणि भारताच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये तरुणांची भूमिका यावर प्रकाश टाकला. असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण ठेवून प्रत्येक विद्यार्थ्याने देश उभारणीसाठी प्रामाणिकपणे योगदान दिले पाहिजे, असे आवाहन यावेळी केले.
सूत्रसंचालन प्रा.डॉ.संजय चौधरी यांनी केले. हा सोहळा यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.