बॉक्सिंग असोसिएशन ऑफ जळगावच्या जिल्हाध्यक्षपदी नरेंद्र मोरे यांची बिनविरोध निवड
Narendra More Unanimously Elected President of Boxing Association of Jalgaon जळगाव (शनिवार, 15 ऑगस्ट 2026) : बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया संलग्न महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या बॉक्सिंग असोसिएशन ऑफ जळगावच्या जिल्हाध्यक्षपदी नरेंद्र मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
जळगावात बॉक्सिंग असोसिएशन ऑफ जळगावची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी निलेश बाविस्कर, चुनिलाल गुप्ता, संतोष सुरवाडे, दीपक वाल्डे, तुकाराम सोनवणे, नयन राणे, मनोज सूर्यवंशी आणि भूषण पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत नरेंद्र मोरे यांची जिल्हाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.




बॉक्सिंग खेळाचा प्रचार आणि प्रसार करणार : नरेंद्र मोरे
निवडीनंतर नरेंद्र मोरे यांनी जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागात विविध उपक्रम व योजना राबवून बॉक्सिंग खेळाचा प्रचार आणि प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच अधिकाधिक खेळाडूंना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडीनंतर शुभेच्छांचा वर्षाव
नरेंद्र मोरे यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष राहुल शेवाळे, वरिष्ठ उपाध्यक्ष रणजित सावरकर, महासचिव राकेश तिवारी आणि कोषाध्यक्ष मिलन वैद्य यांनी त्यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.