गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
जळगाव (शनिवार, 15 ऑगस्ट 2026) : गोदावरी अभियांत्रिकी महाविदयालयामध्ये 15 ऑगस्ट 2026 रोजी 80 वा स्वातंत्र्यदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. या प्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर, डॉ. विजयकुमार पाटील (प्राचार्य), गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य नीलिमा चौधरी मॅडम, तसेच गोदावरी फाउंडेशन अंतर्गत असणार्या सर्व महाविद्यालयाचे मान्यवर उपस्थीत होते.




स्वातंत्र्य दिनी गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूल तसेच गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनीच्या वतीने देशभक्तीपर गीत तसेच देशभक्तीपर भाषणे अतिशय सुंदर पद्धतीने सादर केले. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषणामध्ये नवकल्पनांचे सादरीकरण केले. त्यामध्ये त्यांनी नवभारत निर्मिती, विकसित भारत अभियान, या विषयांवर मते मांडली.
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी नया भारत यांची काही महत्त्वाच्या बाबी स्पष्ट केल्या. त्यात त्यांनी दूरदर्शी दृष्टीकोन अंतर्गत सांगताना स्वातंत्रतेच्या शतकात प्रवेश करणार्या देशाचा विकासशील आत्मनिर्भर राष्ट्र बनवण्यासंदर्भात संदेश दिला. तसेच महाविद्यालयाबद्दल सांगताना उत्तरोत्तर झालेल्या प्रगतीचा आलेख नमूद केला.
डॉ.उल्हास पाटील सर यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. गोदावरी फाउंडेशन अंतर्गत असणार्या सर्व महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा सांगताना गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय हे आता शैक्षणिक क्षेत्रातील गौरवशाली वाटचाल करीत आहे, व महाविद्यालय नवनवीन शिखरे काबीज करीत आहे तसेच महाविद्यालयाला वेगवेगळ्या क्षेत्रात मिळालेल्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. स्वतंत्रता दिना बद्दल सांगताना त्यांनी आजचा दिवस आपल्यासाठी केवळ उत्सव नाही तर नया भारत या ध्येयाच्या दिशेने एक मजबूत व प्रेरक पाऊलही आहे. आपला उद्देश 2047 ला भारताला आत्मनिर्भर विकसित आणि सशक्त राष्ट्र म्हणून उभे करणे आहे, असे त्यांनी नमूद केले. सर्व विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांचे स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्कृष्टपणे सादरीकरण केल्याबद्दल कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला.
त्यानंतर डॉ. किरण पाटील (रेडिओलॉजिस्ट) तसेच अश्विनी दीदी यांनी प्रजापिता ब्रह्मकुमारी संकल्प अंतर्गत ओम शांती मंत्राचे उच्चारण केले. तसेच नशा मुक्त व व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी त्यांनी आवाहन करताना विद्यार्थ्यांना त्या संदर्भात मार्गदर्शन केले.
स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच डॉ.उल्हास पाटील विधी कॉलेज, गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड इन्स्टिट्यूट, गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल व इतर संस्थांचे प्राध्यापक वर्ग व मान्यवर उपस्थित होते.