भुसावळातील जय गणेश फाउंडेशनच्या नवसाच्या गणपतीचे भूमिपूजन
भुसावळ (रविवार, 16 ऑगस्ट 2026) : शहरातील सुरभी नगरातील जय गणेश फाउंडेशनच्या नवसाचा गणपतीच्या आरास सभा मंडपाचे भूमिपूजन फाउंडेशनच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख सुधीर देशपांडे यांच्याहस्ते सपत्नीक करण्यात आले. नवसाच्या गणपतीचे हे 20 वे वर्ष आहे. दरवर्षाप्रमाणेच यावर्षी देखील पुण्याच्या धर्तीवर संपूर्ण 10 दिवस लहान-थोरांपासून ज्येष्ठ वृद्धांपर्यंत असे विविध सांस्कृतिक, सामाजिक, आरोग्यविषयक उपक्रम घेऊन सांस्कृतिक गणेशोत्सव साजरा करणार असल्याचे जय गणेश फाऊंडेशन चे संस्थापक, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी याप्रसंगी सांगितले.
19 वर्षांची परंपरा
गत 19 वर्षांची परंपरा कायम ठेवत यंदासुद्धा मूर्ती 18 इंचाचीच राहणार असून विसर्जन मिरवणूक पारंपरिक वाद्यांच्या गजरात होणार आहे.




भूमिपूजन प्रसंगी नगरसेवक संतोष चौधरी (दाढी), नगरसेविका पल्लवी कोलते, अध्यक्ष राजेंद्र यावलकर, समन्वयक गणेश फेगडे, जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष नारायण वडदकर, युथ क्लब अध्यक्ष हर्षल वानखेडे, स्पोर्ट्स क्लब अध्यक्ष विशाल आहुजा, कार्याध्यक्ष तुषार झांबरे, उपाध्यक्ष राहुल भावसेकर, सचिव प्रकाश चौधरी, फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व परिसरातील बहुसंख्य स्त्री-पुरुष भाविक उपस्थित होते.