भुसावळातील एसीएल डेपोत स्वातंत्र्यदिन उत्साहात
भुसावळ (रविवार, 16 ऑगस्ट 2026) : मध्य रेल्वेच्या एसीएल डेपोत 80 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात, आनंदात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. मुख्य समारंभात उप मुख्य सामग्री प्रबंधक प्रवीणकुमार कोरे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थित सर्व रेल्वे अधिकारी, कर्मचारी व कामगारांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
उल्लेखनीय कामांचा आढावा
ध्वजारोहणानंतर प्रवीणकुमार कोरे यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, मुंबई यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त जारी केलेला विशेष संदेश उपस्थितांना वाचून दाखविला. या संदेशामध्ये जानेवारी ते जुलै 2026 या कालावधीत मध्य रेल्वेने केलेल्या विविध उल्लेखनीय कामांचा, विकास प्रकल्पांचा आणि महत्त्वपूर्ण उपलब्धींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रवाशांच्या सुविधा वाढविणे आणि रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी मध्य रेल्वेकडून करण्यात येत असलेल्या विविध प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
वरिष्ठ सामग्री प्रबंधक आलोक सिंह यांच्यासह रवींद्र बडगुजर, अमोल पाटील, विनोद वाघे, विश्वदेव यादव, ज्ञानेश्वर गावंडे, संदीप भारसके, सचिन हनवटे, संतोष सनांसे, धनराज जंगले तसेच मोठ्या संख्येने रेल्वे कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते. देशभक्ती,उत्साह, एकता आणि राष्ट्रीय अभिमानाच्या वातावरणात स्वातंत्र्यदिनाचा हा सोहळा उत्साहात व दिमाखात पार पडला.
