भुसावळातील पी.एम.श्री.द.शि.विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात


भुसावळ (मंगळवार, 18 ऑगस्ट 2026) : नगरपरिषद संचलित पी.एम.श्री.द.शि.विद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शालेय परिसर आकर्षक पताका व सुंदर रांगोळ्यांनी सजविण्यात आला. प्रारंभी शिक्षण समितीचे चेअरमन राजेंद्र आवटे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.

यांची होती उपस्थिती
या प्रसंगी गटनेते युवराज लोणारी, प्रभारी नगराध्यक्ष शैलेजा नारखेडे, महिला व बालकल्याण सभापती शोभा इंगळे, मुख्याध्यापक एस. ए. मंदवाडे यांच्यासह शालेय शिक्षण समितीचे सदस्य, नगरसेवक, माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजसंचलनाचे नेतृत्व सी.बी.ढाके यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा पाटील यांनी केले. स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. यशस्वीतेसाठी उत्सव समिती चेअरमन जे.टी.मगरे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !